Sun, Nov 18, 2018 01:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबाद दंगलीसंदर्भात मुख्यमंत्री न भेटल्याने मंत्रालयाच्या दारात आमदारांचा ठिय्या

औरंगाबाद दंगलीसंदर्भात मुख्यमंत्री न भेटल्याने मंत्रालयाच्या दारात आमदारांचा ठिय्या

Published On: May 22 2018 2:30PM | Last Updated: May 22 2018 2:30PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

औरंगाबाद दंगलीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्याने मुस्लिम आमदारांनी मंत्रालयाच्या दारात ठिय्या मांडला. मुख्यमंत्र्यांना पालघर निवडणुक प्रचारासाठी वेळ मिळतो मात्र औरंगाबाद दंगलीसंदर्भात भेट घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप आमदारांनी केला. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याने वारिस पठाण, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार, अबू आझमी यांनी मंत्रालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन केले.

औरंगाबाद शहरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून दोन गट तुफान हणामारी झाली होती आणि त्यातून हिंसाचार झाला होता. शहरातील मोतीकारंजा परिसरात दोन गटात तलवारी, चाकूसह शुक्रवारी रात्री भिडले. जमावाने शहागंजमध्ये केलेल्या जाळपोळीत एकाचा तर पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत.