Mon, Sep 24, 2018 02:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार परिचारक यांना सभागृहात येण्यास मनाई

आमदार परिचारक यांना सभागृहात येण्यास मनाई

Published On: Mar 06 2018 3:43PM | Last Updated: Mar 06 2018 3:42PMमुबंई : प्रतिनिधी

देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्यात यावे. त्यांना विधान मंडळाच्या या पवित्र सभागृहात पाय ठेवू देऊ नका, अशी मागणी शिवसेना सदस्य अनिल परब यांनी  केली होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी देखील या मागणीला पाठींबा दिला. त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी परिचारक यांच्या बडतर्फीच्या ठराव तपासून मगच निर्णय देण्यात येईल असे सांगितले. 

सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहातील एकंदर भावना लक्षात घेता, त्यांना या संदर्भातील प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येऊन नये असे स्पष्ट केले. संसदीय कार्य मंत्री गिरिष बापट यांनी देखील ते मान्य करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार परिचारक यांना सभागृहातील कामकाजात सहभागी होता येणार नाही.