Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार हेमंत टकले राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय चिटणीसपदी

आमदार हेमंत टकले राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय चिटणीसपदी

Published On: Sep 08 2018 12:56PM | Last Updated: Sep 08 2018 1:01PMमुंबई : प्रतिनिधी

आमदार हेमंत टकले यांच्यावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय स्तरावरील चिटणीसपदाची जबाबदारी अध्यक्ष शरद पवार यांनी सोपवली आहे. गेली अनेक वर्ष आमदार टकले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गेली अनेक वर्ष आमदार हेमंत टकले हे राजकारण आणि सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत.

आमदार हेमंत टकले हे राष्ट्रवादीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी राजकारणासोबतच सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम केले आहे. विधान परिषद सभागृहामध्ये वेगवेगळया विषयांवर प्रभावी मांडणी करणे आणि त्या विषयाचे गांभीर्य सरकारपर्यंत पोचवण्याचा त्यांचा विशेष हातखंडा आहे. कला-साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये शेवटच्या पानावर त्यांचे विशेष ‘सदर’ सुरु आहे. विधान परिषदेमध्ये पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणूनही ते काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नॅशनल रिलीफ फंडचे प्रमुख आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त म्हणूनही ते सध्या काम पहात आहेत.

आमदार हेमंत टकले यांची राष्ट्रीय चिटणीस म्हणून नेमणूक झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह प्रदेशच्या वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.