Sat, Nov 17, 2018 04:30



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडाचे घर तुटीचे; तरीही राज्यभर बांधणार १५ हजारांवर घरे

म्हाडाचे घर तुटीचे; तरीही राज्यभर बांधणार १५ हजारांवर घरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) यंदाच्या 2018-19 सालासाठी 221 कोटी 12 लाख रूपयांच्या तूटीचा अर्थ संकल्प सोमवारी सादर करण्याता आला. आगामी वर्षामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये एकूण 15 हजार 430 घरे बांधण्याचे अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले आहे. त्यासाठी म्हाडाने तब्बल 4 हजार 398 कोटी 25 लाख रूपयांची तरतूद केली आहे. तसेच या वर्षात म्हाडाच्या 947 इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे लॉटरी झालेल्या इमारतींच्या वितरणापोटी मुंबईसह राज्यातून 741 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. पुणे आणि कोकण मंडळाकडील निर्माण झालेल्या घरांचा या वर्षभरातील विक्रीतून सुमारे 3 हजार 947 कोटी रुपये प्राधिकरणाला मिळणार आहेत.  

मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून सन 2017-18 सालामध्ये 850 मोडकळीस आलेल्या इमारतींती दुरूस्ती करण्यात आली, तर पुढील वर्षी 947 इमारतींची दुरूस्ती करणे प्रस्तावित आहे. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून नागरी दलित वस्ती सुधार योजना, सौंदर्यीकरण, संरक्षक भिंती बांधणे इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून मुंबईतील झोपडपट्टीवासियांचे जीवनमान सुखकर करणे अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाच्या सबसिडीसाठी 15 कोटींची तरतूद आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी 50 कोटीची तरतूद करण्यात आली होती. तर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान अनुदान प्रकल्प (पीएमजीपी) अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.






  •