Mon, May 20, 2019 18:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म. गांधी हत्येच्या आरोपातून सावरकरांची निर्दोष मुक्तता

म. गांधी हत्येच्या आरोपातून सावरकरांची निर्दोष मुक्तता

Published On: Apr 06 2018 2:13AM | Last Updated: Apr 06 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

महात्मा गांधी हत्येच्या आरोपातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तब्बल 70 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 30 जानेवारी 1948 रोजी झालेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येची पुनर्निवेदना करण्याची मागणी अभिनव भारत या संस्थेने केली होती. या संस्थेचे विश्वस्त, प्रसिद्ध लेखक डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देताना गांधी हत्येच्या घटनेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना निर्दोष मुक्त केले आहे, असे फडणीस यांनील सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी हत्येसाठी दोषी ठरवणार्‍यांना सर्वोच्च न्यायालयाची ही चपराक आहे, असे ठाम मत फडणीस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी गुरुवारी समितीच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आपण गेली अडीच वर्षे हा लढा दिला. केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाकडे याप्रकरणी दाद मागितली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातही याचिका फेटाळली गेली. अखेर सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केल्यावर यश मिळाले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची 70 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली, असे डॉ. फडणीस यांनी सांगितले.

1948 साली झालेल्या गांधीजींच्या खुनाप्रकरणी प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक वीर सावरकर यांच्यावरही कटात सामील झाल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु 28 मार्च 2018 रोजीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कोणीही आव्हान न दिल्यामुळे आता सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून त्यांचा या हत्येशी कोणताही संबंध नव्हता असे जाहीर करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी रणजित सावरकर म्हणाले की, या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गोवणे चुकीचे होते. मात्र एका ताकदवान नेत्याच्या आरोपींमुळे सावरकर यांना विनाकारण गोवले गेले. अजूनही सावरकर यांना बदनाम करण्याची कारस्थाने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

tags : mumbai, mumbai news, M Gandhi, assassination, charges, Savarkar, acquittal,