Mon, Sep 24, 2018 04:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वस्ताईने वाढणार एसी लोकलची गर्दी

स्वस्ताईने वाढणार एसी लोकलची गर्दी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेवर 1 जानेवारीपासून धावणार्‍या वातानुकूलित लोकलचे दर सध्याच्या फर्स्ट क्लासच्या दरांपेक्षा सुमारे 50 टक्के कमी करण्याच्या प्रस्तावामुळे या लोकलची गर्दी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेल्वे बोर्डाने फर्स्ट क्लास समकक्ष दरास मंजुरी दिल्यास फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना वातानुकूलित लोकलमध्ये थेट प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय वातानुकूलित लोकलसाठी मासिक, त्रैमासिक पास उपलब्ध करण्याचाही पर्याय तपासण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवरील फर्स्ट क्लासचे सर्वात कमी तिकीट 50 रुपये आणि सर्वात जास्त तिकीट 170 रुपये एवढे आहे. त्या पार्श्वभूमीवर फर्स्ट क्लासपेक्षा किमान 50 टक्के इतके कमी दर असावेत असा विचार आहे. दर कमी असल्यास सेकंड क्लासमधील प्रवाशांनाही आरामदायी प्रवास देण्याची योजना आहे.