Wed, Mar 20, 2019 09:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोअर परळ पूल पादचार्‍यांसाठी खुला!

लोअर परळ पूल पादचार्‍यांसाठी खुला!

Published On: Jul 27 2018 1:48AM | Last Updated: Jul 27 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

बंद करण्यात आलेल्या लोअर परळ पुलाचा काही भाग पादचार्‍यांसाठी शुक्रवारपासून खुला होणार आहे. पादचार्‍यांसाठी पुलाच्या  एका बाजूचा डिलाईल रोड ते लोअर परेलपर्यंतचा भाग सुरू करण्याची मागणी  प्रवासी करत होते. गुरुवारी पालिका अधिकारी आणि संबंधित रेल्वेचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुलाच्या सद्य स्थितीचा आढाव घेण्यासाठी पाहणी दौरा केल्यानंतर पुलाचा काही भाग सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 

लोअर परळचा रेल्वे पूल मंगळवारपासून वाहतूक आणि पादचार्‍यांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लोअर परळ रेल्वे पुलाजवळ नागरिकांची गर्दी होऊ लागली.लोअर परळ स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे, पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली उतरण्यासाठी असलेली जागा ही अत्यंत लहान आहे, या रस्त्यावरच दुचाकीही उभ्या असतात. तसेच स्थानकाशेजारी एका इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी असलेल्या जागेतून पोलीस व महापालिकेने पादचार्‍यांना स्थानकापर्यंत वाट करून दिली.बुधवारी झालेल्या बैठकीत संबंधित रेल्वे अधिकारी, बृहन्मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी,वाहतूक पोलीस व मुंबई पोलीस यांनी या पुलाची पाहणी करुन या पुलावरील कुठला भाग,कुठल्या प्रकारच्या वाहतूकीसाठी खुला करता येऊ शकतो, याची पहाणी करून याचा निर्णय घ्यावा घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी सकाळी पुलाची पहाणी करण्यात आली. तसेच मध्यरात्री पर्यंत  बॅरिगेट बसवून पूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका तसेच रेल्वे अधिकार्‍यांनी दिली.

शिवसेना- मनसे श्रेयवादासाठी आमनेसामने:    

मुंबईतील लोअर परेलमध्ये असलेल्या उड्डाणपुलावर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आपल्या पाहणी दौर्‍यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण वेळीच शांत केले.वरळी भागातील शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी लोअर परेलच्या उड्डाणपुलावर गेले होते. त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. पूल बंद असल्यामुळे उसळणार्‍या गर्दीमुळे एलफिस्टनप्रमाणे दुर्घटना घडू शकत होती. त्यासाठी पूल पादचार्‍यांसाठी खुला करणे महत्त्वाचे होते असे आमदार अजय चौधरी यांनी सांगितले.