Wed, Nov 21, 2018 04:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोअर परळ पूल बंद झाल्याने ‘एल्फिन्स्टन’वर वाहतूक कोंडी

लोअर परळ पूल बंद झाल्याने ‘एल्फिन्स्टन’वर वाहतूक कोंडी

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 2:05AMमुंबई : प्रतिनिधी

लोअर परळ पूल बंद झाल्यामुळे एल्फिन्स्टन पुलावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. लोअर परळचा उड्डाण पूल 24 जुलैपासून बंद करण्यात आल्यामुळे प्रचंड वळसा घालून वाहनचालकांना लोअर परळ, वरळीहून लालबाग, परळ तसेच भायखळ्याकडे येताना प्रचंड वळसा घालून यावे लागत आहे. प्रचंड वळसा घालून यावे लागत असल्यामुळे आधीच हैराण होत असलेले वाहनचालक या वाहतूक कोंडीमुळे पुरते हैराण झाले आहेत.

परळ उड्डाणपुलाच्या सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.अँब्युलन्सलाही वाट मिळणे अवघड झाले आहे. परळ विभागात अनेक रुग्णालये असल्याने रुग्णवाहिकांना वाट मिळणे गरजेचे असताना या वाहतूक कोंडीमुळे एल्फिन्स्टन पूल ओलांडण्यासाठी तब्बल 20 मिनिटे लागत आहेत. एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात नेण्यास विलंब होऊन जीव गमवावा लागू शकतो. या वाहतूक कोंडीवर पर्यायी मार्ग काढणेही सध्यातरी अवघड आहे.