Mon, Dec 09, 2019 11:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; लग्‍नाची वेळ येताच प्रेयसीकडे मागितले 50 लाख

पाच वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; लग्‍नाची वेळ येताच प्रेयसीकडे मागितले 50 लाख

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 22 2018 12:42AMमुंबई : अवधूत खराडे

वयाने मोठ्या असलेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि पाच वर्षांनी ज्यावेळी लग्नाची वेळ आली तेव्हा प्रियकराने हुंड्यापोटी तब्बल 50 लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना चेंबूरच्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकरासह त्याच्या कुटुंबाविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमसंबंधांना पाच वर्षे होत असल्याने तिने त्याच्याकडे लग्नासाठी हट्टच धरला. वयाने मोठी असताना त्याच्या कुटुंबीयांनीही या लग्नाला होकार दिला. आनंदात असलेल्या या तरुणीने सुखी संसाराची स्वने रंगविण्यास सुरुवात केली. मात्र अचानक प्रियकरासह त्याच्या कुटुंबीयांनी लग्न करुन देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली. हुंडा न दिल्यास लग्न होणार नाही असेही बजावले. हुंड्याची मागणी झाल्याने तरुणीचा संताप अनावर झाला. तिने थेट पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दिली. आणि आणखी एका हायप्रोफाईल प्रेमप्रकरणाची ही कहाणी जगासमोर आली आहे.