Wed, Nov 21, 2018 11:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘प्रधानमंत्री आवास’मधील पाच हजार घरांची लॉटरी

‘प्रधानमंत्री आवास’मधील पाच हजार घरांची लॉटरी

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी 

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यामध्ये काढण्यात येणार्‍या मुंबईमधील एक हजार घरांच्या लॉटरीनंतर म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे प्रधानमंत्री योजनेतील (पीएमएवाय) पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 

मुंबई मेट्रो रिजनमध्ये येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पीएमएवायमधील घरांचे बांधकाम होणार असल्याचे गृहनिर्मानमंत्री प्रकाश महेता यांनी स्पष्ट केले. पीएमएवायमध्ये म्हाडामार्फत मोठ्या प्रमाणावर घरे बांधण्यासाठी सरकारने निधीची तरतुद केली असल्याने मोठ्या संख्येने कमी किंमतीमध्ये घरे उपलब्ध होतील असेही महेता यावेळी म्हणाले. तसेच विकासक, जमिनदार आणि म्हाडा मिळून सार्वजनिक खाजगी भागिदारी (पीपीपी) तत्वावरही गृहप्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासोबतच म्हाडा स्वतःही काही गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पांमध्ये तयार होणारी घरे कमी किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत.