Thu, Aug 22, 2019 03:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उसाची बिले थकल्याने कर्जवसुलीवर परिणाम

उसाची बिले थकल्याने कर्जवसुलीवर परिणाम

Published On: May 19 2018 1:34AM | Last Updated: May 19 2018 1:03AMमुंबई : चंद्रशेखर माताडे 

साखर उद्योग अडचणीत असल्याने  उसाची बिले थकली आहेत.ही बिले थकल्याने त्याचा बँका  व सोसायट्यांच्या कर्जवसुलीवर  होणार आहे. ऊस  बिले मिळाल्यानंतर साधारणपणे उसासाठी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड ही 30 जुनपर्यंत केली जाते. मात्र यंदा 30 जुनपूर्वी बिले मिळण्याची शक्यता कमी असल्याने बँका व सेवा सोसायट्या  थकबाकीत जाणार आहेत. तर ऊस  उत्पादकही थकबाकीत गेल्याने त्याला नव्याने कर्ज मिळण्यात अडचण येणार असुन साखर कारखान्यांचीही पूर्वहंगामी कर्जासाठी कोंडी होणार आहे.

साखर उद्योगाची अवस्था ही दिवसेंदिवस  बिकट होत आहे. त्याचा परिणाम हा या उद्योगावर अवलंबून घटकांवर होत आहे.  त्याचा पहिला फटका हा बँका व सेवा सोसायट्यांना बसणार आहे. देशातील साखर उद्योग संकटात असल्याने देशभरातील ऊस उत्पादकांचे 19 हजार कोटी रूपये थकले आहेत. तर महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचा 5 हजार कोटी रूपये थकले आहेत. दसर्‍या बाजुला  ऊस उत्पादक शेतकरीही थकबाकीदार होणार आहेत.ऊसाचे पैसेच न मिळाल्याने बँका व सेवा सोसायट्यांची कर्जे कशी भागवायची हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. बँका व सोसायट्यांच्या थकबाकीच्या बरोबरीने शेतकरीही थकबाकीदार ठरेल. तो थकबाकीदार ठरल्याने त्याला पुढच्या हंगामासाठी कर्ज मिळण्यात अडचणी येणार आहेत.

गळीत हंगामासाठी विशेष उपाययोजनांची गरज

या सगळ्याचा परिणाम हा पुढील गळीत हंगामावर होणार  आहे. बँका  व सेवा सोसायट्या थकबाकीदार, ऊस उत्पादक थकबाकीदार, साखर कारखाने थकबाकीदार मग गळीत हंगाम सुरू कसा करायचा हा मोठा प्रश्‍न आहे.  पुढील वर्षी कारखाने सुरू करायचे तर सरकारला विशेष पावले टाकावी लागणार  आहेत.