Tue, Jun 25, 2019 13:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोनोवर एमएमआरडीएचा भरोसा नाय

मोनोवर एमएमआरडीएचा भरोसा नाय

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

तोट्यात चाललेल्या मोनोरेलवरून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) भरोसा उडाला आहे. यामुळे प्राधिकरणाने 2018-19 या वर्षाचे मोनोतून होणार्‍या मिळकतीचे लक्ष्य हे 30 कोटी केले आहे. मुंबईमध्ये देशातील पहिली मोनो फेब्रुवारी 2014 मध्ये चेंबुर ते वडाळा दरम्यान सुरू करण्यात आली, मात्र प्रवाशांनी या मार्गाकडे पाठ फिरवल्याने या मार्गिकेवर मोनोमुळे प्राधिकरणाला दररोज 6 लाख 40 हजार रूपये तोटा सहन करावा लागत होता. प्राधिकरणाने 2017-18 सालामध्ये 44 कोटी रूपयांची कमाई या मार्गावर होणे अपेक्षित असताना या मार्गावर फक्त 8 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

एमएमआरडीएला मोनो रेलच्या चेंबुर ते वडाळा या पहिल्या टप्प्यात गेल्यावर्षी कमी महसूल जमा झाल्याने 2018-19 या वर्षामध्ये हे लक्ष्य कमी केले आहे. 09 नोव्हेंबर 2017 रोजीपासून मोनोरेलचा पहिला टप्पा आग लागल्याच्या घटनेपासून बंदच आहे. मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यामधून प्राधिकरणाला तोटा सहन करावा लागल्याने प्राधिकरणाने लक्ष्य कमी केले आहे. मात्र मोनोरेलचा वडाळा ते जेकब सर्कल असा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर प्रवाशांची संख्या या संपुर्ण मार्गावर प्रवाशांची संख्या वाढेल, असा आशावाद बाहतुक तज्ञांनी केला आहे. यामुळे प्राधिकरणाने मोनोवरून भरोसा उडू देता कामा नये, असे त्यांचे म्हणणे आहे. वडाळा ते चेंबुर हा पहिला आणि वडाळा ते जकब सर्कल हा दुसरा टप्पा एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला सुरू होणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मोनोरेलची चाचणी घेऊन दोनवेळा तपासणी केली आहे. लवकरच अंतीम दौरा करण्यात आल्यावर या मार्गावर मोनो चालवण्यासाठी हिरवा कंदील मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना या दोन्ही मार्गावर चेंबुर ते जेकब सर्कल असा थेट प्रवास करणे शक्य होईल.

Tags : Loss Monorail issue, mumbai news,


  •