Thu, Jan 24, 2019 13:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जन्माष्टमीलाच कृष्ण मंदिर लुटले

जन्माष्टमीलाच कृष्ण मंदिर लुटले

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 12:57AMठाणे : प्रतिनिधी

कृष्णजन्माच्या दिवशीच कृष्ण मंदिरात चोरी झाल्याची घटना ठाण्यातील जांभळीनाका भागात रविवारी घडली. या मंदिरातून दानपेटीतील रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज अशी एकूण सुमारे 35 लाखांची चोरी झाल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना चोरट्यांची ओळख पटली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.

जांभळीनाका भागातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरात वैष्णव समाजाचे गोवर्धन वैष्णव मंदिर हवेली हे कृष्णाचे 60 ते 70 वर्षे जुने मंदीर आहे. रविवारी पहाटे या मंदिराच्या मागच्या बाजूने चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून कृष्ण मूर्तीला अर्पण करण्यात आलेले सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 35 लाख किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवून पोबारा केला.

या मंदिराच्या पुजार्‍याने रविवारी सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांचा तपास सुरू असून सीसीटीव्हीत एक चोरटा कैद झाला असल्याची माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली.मंदिरात चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या रडावर असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकतेअशी माहिती सूत्रांनी दिली.