Sat, Aug 24, 2019 18:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डबा घसरून मरे ठप्प

डबा घसरून मरे ठप्प

Published On: May 27 2019 1:46AM | Last Updated: May 27 2019 1:46AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दिवसभराचा मेगा ब्लॉक असतानाच रविवारी रात्री 9 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्‍या लोकलचा डबा कुर्ला स्थानकाच्या तिसर्‍या प्लॅटफॉर्मवर घसरल्याने मध्य रेल्वे सुमारे दोन तास ठप्प झाली आणि ठिकठिकाणी रविवारचे प्रवासीही अडकून पडले. 

डबा घसरल्यानंतर पुढे दोन तास या मार्गावरून एकही लोकल धावली नाही. अप आणि डाऊन  धिम्या मार्गावरील 20 हून अधिक लोकल रद्द करण्यात आल्या. लोकल घसरलेल्या मार्गावर मरेच्या धिम्या लोकलच्या रांगा घाटकोपर स्थानकापर्यंत लागल्या  आणि अडकलेल्या प्रवाशांनी सरळ पायपीट करीत जवळचे स्थानक गाठले. याशिवाय धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावरही वळवण्यात आल्या व त्या तुडुंब गर्दीने धावत होत्या. रात्री 9 वाजता घसरलेली रेल्वे 11 च्या सुमारास पुन्हा रूळावर चढवण्यात आली व तिला कारशेडला पाठवल्यानंतरच हा मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतरच पुन्हा लोकल गाड्या धावण्यास हळू हळू सुरूवात झाली.