Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलवर स्टंट करणार्‍या तरुणांना ठोकल्या बेड्या 

लोकलवर स्टंट करणार्‍या तरुणांना ठोकल्या बेड्या 

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 1:44AMकुर्ला : वार्ताहर

गेले तीन दिवस मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या हार्बर मार्गावर तीन तरुणांचा स्टंट आणि धावत्या लोकलमधून मोबाईल चोरीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता. यात चार तरुण धावत्या लोकलमधून बाहेर लटकत, लोकलच्या छतावर , खिडीकीवर चढून धोकादायक स्टंट करीत होते. तर लोकल गुरू तेगबहाद्दर नगर रेल्वेस्थानकात येताच एका प्रवाशाचा मोबाईलदेखील हिसकावून घेतला होता. स्वतः याच तरुणांनी हा व्हिडीओ काढून व्हायरल केला होता. अखेर या चारही तरुणांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

मोहम्मद अली अमीर अली शेख उर्फ मम्मा(19) कसाईवाडा कुर्ला, मोहम्मद जैयद शेख मुमताज ऊर्फ जावेद(19) मुंब्रा, रोहित गजानन चौरासिया(20)  नेहरूनगर कुर्ला, शेहबाज मोहम्मद जावेद खान(18) कुर्ला अशी या स्टंट करणार्‍या अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या स्टंटचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर लोहमार्ग पोलीस, गुन्हे शाखा आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान या तरुणांचा शोध घेत होते. कुर्ल्यात हे चारही आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळताच बुधवार दि 1 रोजी वडाळा लोहमार्ग पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश लाहिगुडे, पोलीस हवालदार मंगेश साळवी, पोलीस नाईक गुरू जाधव, पोलीस शिपाई अमित बनकर, अक्षय कणसे, योगेश कदम इत्यादी अधिकार्‍यांनी त्यांना तिथून ताब्यात घेतले.