Fri, Mar 22, 2019 05:47
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : लोकलच्या डब्याला आग; जीवितहानी नाही

ठाणे : लोकलच्या डब्याला आग; जीवितहानी नाही

Published On: Jan 17 2018 10:19AM | Last Updated: Jan 17 2018 10:19AM

बुकमार्क करा
ठाणे : अमोल कदम

ठाणे स्थानकात लोकलच्या डब्याला मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली. फलाट क्र. १ च्या साईडींगवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून आलेल्या लोकलच्या डब्याला आग लागली होती. अग्निशमनच्या जवानांनी डब्याची आग आटोक्यात आणली.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाची ४ फायर वाहने, २ वॉटर टँकर, १ रेस्क्यु वाहन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. परंतु ठाणे स्थानकावरील रात्रीच्या वेळी अधिकारी वर्ग जाग्यावर नसल्याने प्रवाशंनी नाराजी व्यक्त केली. तसेच फायर व्यवस्था किती कमजोर असल्याने प्रवशामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.