Sun, Nov 18, 2018 19:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसी लोकलला अच्छे दिन

एसी लोकलला अच्छे दिन

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 12:34AMमुंबई : प्रतिनिधी

उन्हाच्या झळा बसू लागल्याने लुंबईकर पुरते वैतागून गेले आहेत. वाढत्या गर्मीमुळे  आणि प्रचंड गर्दीमुळे पुरते घामाघूम होण्याची वेळ चाकरमान्यांवर आली आहे. गर्मीपासून सुटका व्हावी, यासाठी थंड पेय असो किंवा इतर काही साधने. लोक त्यांचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, मुंबई लोकलमध्ये फर्स्ट क्‍लासचा प्रवास करणारे आता गर्मीपासून सुटका करुन घेण्यासाठी वातानुकूलित लोकलने प्रवास करु लागल्याने एसी लोकलला अच्छे दिन आले आहेत.

बहुचर्चित आणि प्रतिक्षित एसी लोकल 25 डिसेंबरचा मुहूर्त गाठत मुंबईकरांच्या सेवेत आली. पण, सेवेत आल्यापासून एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पण, मार्च महिन्यापासून मुंबईतील गर्मी मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याचा फायदा एसी लोकलला झाला. 

एसी लोकलला जसा प्रतिसाद जानेवारी-फेब्रुवारी मिळत होता. त्यापेक्षा दुप्पट प्रवाशांची गर्दी सध्या या एसी लोकलमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. शिवाय, एसी लोकलला आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत 7 लाख 28 हजार 515 प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. त्यातून 3 कोटी 17 लाख 91 हजार 526 रुपयांची कमाई पश्चिम रेल्वेला झाली. शिवाय, जूनपर्यंत तरी अशीच परिस्थिती राहिल्यास प्रवाशांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकेल, अशी अपेक्षाही जनसंपर्क अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

Tags :Mumbai, Mumbai news, Local, Air Conditioned, Travel, AC Local, Good Day,