Wed, Jun 26, 2019 11:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिअर महागली, ३१ डिसेंबर तोट्यात

बिअर महागली, ३१ डिसेंबर तोट्यात

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:52AM

बुकमार्क करा

ठाणे : नरेंद्र राठोड

यंदाच्या नवर्षावर महागाईचे सावट असून मद्याच्या दरात १५ टक्के तर मटन, चिकनच्या दरात २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी महागाईची ऐशीतैशी करत नववर्ष साजरा करण्याची जोरदार तयारी सुरु केल्याचे चित्र ठाण्यात सर्वत्र दिसून येत आहे. ठाण्यात यंदा थर्टीफस्टच्या दिवशी तब्बल ६५ लाख लीटर बियर, ३८ लाख लीटर देशी मद्य तसेच ३५ लाख लीटर विदेशी मद्य विक्री होण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. ६५० एमएलच्या एका बिअरच्या बाटलीवर ३५ ते ४० रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव होता. पण सरकारने थेट इतकी वाढ न करता १५ ते २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक मद्य विक्री यावर्षी होण्याची शक्यता असल्याची माहिती मद्य विक्रेत्यांनी दिली.  नववर्ष स्वागत करण्याचा फिवर तळीरामांमध्ये शिगेला पोहचला आहे. त्यासाठी हॉटेल्स आतापासूनच सज्ज होऊ लागले असून ऐनवेळी गैरसोय टाळण्यासाठी अनेक हॉटेलांनी आता पासूनच टेबल बुकिंग सुरु केली आहे. ठाण्यातील येऊर, घोडबंदर रोड, कल्याण शीळ फाटासह शहरातील सर्वच बार, हॉटेल व धाब्यांवर जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे. चिकन, मटणाच्या बरोबरीला नववर्षला माशांनाही बर्‍याच प्रमाणात मागणी असते. साधारणतः या दिवसांत माशांची विक्री चांगली होते. बाजारात तब्बल डझनभर प्रकारचे मासे विक्रीला आलेले आहेत.