Sat, Jul 11, 2020 22:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

पनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पनवेल : प्रतिनिधी 

पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे याना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र महापालिकेत आले आहे. या पत्रामुळे महापालिकेच्या आवारात खळबळ मजली आहे आहे. आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या सोबत उपायुक्त लेंगरेकर , संध्या बावनकुळे याना देखील गोळी मारून ठार करू असा उल्लेख या धमकी पत्रात करण्यात आला आहे. 

पनवेल महानगर पालिकेच्या कामकाजाचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात असे म्हटले आहे की,‘गोळी मारून तुम्हाला ठार केल्या शिवाय पर्याय नाही.’ तसेच लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक मिळत नाही. पनवेल एसटी स्थानक परिसरातील झोपडपट्टी यावर केलेली कारवाई बद्दल लिहले आहे. तसेच आम्ही जनतेला पैसे देऊन निवडून आलो आहे आमचे पैसे कसे परत मिळणार, आपला विचार बदला कामाची पद्धत बदला.’, अशी धमकी देण्यात आली आहे.

या पत्राबाबात दै . पुढारीशी बोलताना आयुक्त सुधाकर शिंदे म्हणाले की,‘अशा पत्रांना मी घाबरत नाही. माझे काम असेच चालू राहणार आहे.’