Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावीच्या पुस्तकात तंबाखू नियंत्रणाचे धडे

दहावीच्या पुस्तकात तंबाखू नियंत्रणाचे धडे

Published On: May 05 2018 1:22AM | Last Updated: May 05 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी या उद्देशाने बालभारतीने यंदा दहावी इयत्तेच्या दहावीच्या विज्ञान-2 विषयाच्या पाठ्यपुस्तकात तंबाखू नियंत्रणावरील एक पाठ समाविष्ट केला आहे. राज्य शिक्षण मंडळाने यापूर्वीही इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, नववी आणि दहावीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकांमार्फत तंबाखू नियंत्रण व जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली होती. 

सलाम मुंबई फाउंडेशनसारख्या संस्था या दिशेने काम करत असून, मुलांना शालेय वयातच तंबाखूच्या दुष्परिणामांची महत्वपूर्ण माहिती दिली जाईल याची काळजी ते घेत आहेत. यामुळेच दहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात शाळांतील तंबाखूमक्तीसाठी करत असलेल्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यातील हा एक सकारात्मक प्रयोग असल्याची माहिती बालभारतीच्या विज्ञान विभागाचे विशेष अधिकारी राजीव पाटोळे यांनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात दिली.

भारतातील दररोज 5,500 लहान मुले तंबाखू सेवनाची सुरुवात करतात- यातील एक तृतीयांश मुले 10 वर्षांहून कमी वयाची आहेत. 13 ते 15 या वयातील लहान मुलांपैकी 14.6 टक्के तंबाखू उत्पादनांचे सेवन करत आहेत.  गेल्या 10 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण व जागरूकतेसाठी प्रसार करण्याकरण्यासाठी सरकार सलाम मुंबई फाउंडेशनसारख्या संस्थांना अर्थसहाय्य करत आहे.  सरकार गेल्या 10 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण व जागरूकतेसाठी सलाम मुंबई फाउंडेशनने सरकारी तसेच बिगरसरकारी राज्यस्तरीय तसेच स्थानिक संस्थांमध्ये क्षमता विकास घडवून आणला आहे. 

Tags : Mumbai, Lessons, Tobacco, Control, Class, 10, Book