Fri, Jul 19, 2019 22:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  मुंबईत लेप्टोचा सातवा बळी 

 मुंबईत लेप्टोचा सातवा बळी 

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहरात लेप्टोने डोके वर काढले असून लेप्टोमुळे सातवा बळी नोंदवला आहे. मुंबईच्या कांदिवली व्हिलेजमध्ये राहणार्‍या 16 वर्षीय तन्मय प्राज्ञे याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर तन्मयने मुंबईच्या पाटकर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला होता.

ताप आणि उलटीचा त्रास झाल्याने तन्मयला 24 जुलैला मालाडच्या अमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याला लेप्टो झाल्याचे निदान झाले. अमर रुग्णालयात लेप्टोच्या उपचारांसाठी लागणारी उपकरणे नसल्याने त्याला मालाडच्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान तन्मय कोमात गेला आणि शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तन्मयच्या शेजार्‍यांनी दिली.

अमर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. पंकज यांनी सांगितले की, तन्मय रुग्णालयात आला तेव्हाच त्याची प्रकृती खूप चिंताजनक होती. उलट्या, अंगदुखी आणि जुलाबही होत होते. शरीरात ऑक्सिजनची मात्रा केवळ 20 टक्के होती. लेप्टोचे निदान होईपर्यंत त्याचे फुप्फुस आणि यकृत निकामी झाले होते. म्हणूनच त्याला दुसर्‍या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.