Thu, Jun 27, 2019 12:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत लेप्टोचा  दुसरा बळी

मुंबईत लेप्टोचा  दुसरा बळी

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 1:00AMकुर्ला/मुंबई : प्रतिनिधी 

पालिकेच्या सायन येथील लोकमान्य रुग्णालयात सोमवारी लेप्टोने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी लेप्टोने आणखी एकाचा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. 

गोवंडी शिवाजीनगर येथील 28 वर्षीय तरुण इम्तियाझ मोहम्मद अली या तरुणाला 23 जून रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच 26 जून रोजी त्याचा लेप्टोने मृत्यू झाला आहे.

मुंबईत पावसाळ्याच्या काळात साथीचे रोग नेहमीच डोके वर काढत असतात. नुकतीच कुठे पावसाला सुरुवात झाली असून आता लेप्टोचा दुसरा बळी गेल्याने मुंबईत लेप्टोची साथीची भिती पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे

दोन दिवसांपूवीर्र्च भरत रमेश काळे या पंधरा वर्षाच्या तरुणाचाही मृत्यू सायन रुग्णालयात उपचार घेत असतानाच झाला. कुर्ल्याच्या मिलननगर विभागात राहणारा भरत हा कुर्ल्याच्या शिवश्रुष्टी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात साठलेल्या पाण्यात फुटबॉल खेळण्यास  जात असे.  याच ठिकाणी त्याच्या पायाला झालेल्या जखमेतून लेप्टोस्पायरोसीसचे विषाणू त्याच्या अंगात गेले. आठवडाभर या आजाराशी झुंजत असताना सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली.  रमेश काळे आणि भारती काळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये. अचानक मुलगा निघून गेल्याने  काळे कुटुंबीयांवर डोंगर कोसळले आहे. भरत हा यावर्षी दहावीत गेला. वडील आजारी असल्याने बेरोजगार आहेत.  तर आई घरकाम करून घराचा गाडा हाकत होती. अशा परिस्थितीत भरत मोठा होऊन या घराचा आधार होणार होता. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तसेच भरतच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, अशीही मागणी होत आहे.