Thu, Sep 20, 2018 00:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत लेप्टोचा चौथा बळी

मुंबईत लेप्टोचा चौथा बळी

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने मुंबईत लेप्टोस्पायरोसिसने डोके वर काढले आहे. मुंबईत 15 जुलैपर्यंत लेप्टोने चार जणांचा बळी घेतला असून, महापालिकेच्या आरोग्य विभागातील विश्लेषण समितीने या मृत्यूंची नोंद केली आहे. 

जून महिन्यात लेप्टोचे 5 रुग्ण आढळले होते. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात गॅस्ट्रो आणि मलेरियाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे 519 आणि मलेरियाचे 182, लेप्टोचे 19, डेंग्यूचे 16, हेपिटायटिसचे 49 रुग्ण आढळले आहेत.

पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या, 17 वर्षांच्या मुलाचा लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. 574 घरांची तपासणी करण्यात आली. जवळपास 1926 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.