Wed, Nov 21, 2018 21:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लेप्टोचा मुंबईत पहिला बळी?

लेप्टोचा मुंबईत पहिला बळी?

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 2:06AMमुंबई : प्रतिनिधी 

लेप्टोस्पायरोसिसने मुंबईत पहिला बळी गेला. मुंबईच्या सायन रुग्णालयात एका पुरुष रुग्णाचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनीच तसा संशय व्यक्त केला.

मुंबईत पावसाळ्यात  साथीचे रोग डोके वर काढतात. त्यात मोठा धोका लेप्टोचा असतो. मुंबईतील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात उंदीर किंवा इतर प्राण्यांचे मलमूत्र (विष्ठा) अधिक असते. पायावरील जखम उघडी असेल तर लेप्टोचा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो. पावसाळा आत्ता  कुठे  सुरू होत असतानाचा सायन रुग्णालयात लेप्टोने पहिला बळी नोंदवून अ‍ॅलर्टच  दिला आहे. 

आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले की, या  संशयित लेप्टोबळीची गंभीर दखल घेण्यात आली असून, आरोग्य अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर कारण स्पष्ट होईल.