होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील शेर-ए-पंजाब कॉलनीत बिबट्या घुसला (व्हिडिओ)

'शेर-ए-पंजाब'मध्ये बिबट्या घुसला (व्हिडिओ)

Published On: Dec 10 2017 4:49PM | Last Updated: Dec 10 2017 5:00PM

बुकमार्क करा

जोगेश्वरी : प्रतिनिधी

अंधेरी पूर्वेतील शेर-ए-पंजाब कॉलनीत आज पहाटे सहाच्या दरम्यान एक बिबट्या शिरला आहे. कॉलनीतील एका क्लासरूममध्ये घुसला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच वनविभागाची एक रेस्क्यू टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या बिबट्या एका क्लासरूम मध्ये लपून बसला आहे. वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.