Sat, Nov 17, 2018 12:08



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानपरिषद पोटनिवडणूकीवर एमआयएमचा बहिष्कार

विधानपरिषद पोटनिवडणूकीवर एमआयएमचा बहिष्कार

Published On: Dec 07 2017 5:44PM | Last Updated: Dec 07 2017 5:44PM

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी

आज पार पडलेल्या विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या मतदानावर एमआयएमने बहिष्कार टाकला आहे. या पक्षाचे इम्तियाझ जलिल आणि वारिस पठाण यांनी मतदानावर बहिष्कार टाकला तर; राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे मतदानासाठी आले नाहीत. शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची न्यायालयाने आमदारकी रद्द केल्याने ते मतदानात भाग घेऊ शकले नाही.

विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी आज ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. एकूण २८८ पैकी २८४ आमदारांनी मतदान केले आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरूवात होणार आहे.