Mon, Jun 17, 2019 18:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेच्या मैदानात उरले सोळा उमेदवार

विधान परिषदेच्या मैदानात उरले सोळा उमेदवार

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:23AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेच्या 21 मे रोजी सहा जागांसाठी हणार्‍या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जणांनी माघार घेतली असून, आता मैदानामध्ये 16 उमेदवार उरले आहेत.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथून इंद्रकुमार सर्राफ (काँग्रेस), रामदास आंबेडकर (भाजप), जगदीश तिवारी (अपक्ष) सौरभ तिमांडे (अपक्ष) हे उभे आहेत. अमरावती येथून प्रवीण पोटे-पाटील (भाजप), अनिल माधोगडिया (काँग्रेस) यांच्यात लढत आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड येथे सुरेश धस (भाजप), अशोक जगदाळे (अपक्ष-राकाँपा) यांच्यात थेट लढत होईल. परभणी-हिंगोली येथे विप्लव बाजोरिया (शिवसेना), सुरेश देशमुख (काँग्रेस), सुरेश नागरे (अपक्ष) हे उमेदवार आहेत. नाशिक येथून शिवाजी सहाने (राकाँपा), नरेंद्र दराडे (शिवसेना), परवेज मोहम्मद कोकानी (अपक्ष) हे लढत आहेत. रायगड-रत्नागिरी येथे अशोक साबळे (शिवसेना), अनिकेत सुनील तटकरे (राकाँपा) यांच्यात सामना आहे.