Mon, Sep 24, 2018 11:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेसाठी भाजपकडून लाड, तर काँग्रेसकडून माने

विधान परिषदेसाठी भाजपकडून लाड, तर काँग्रेसकडून माने

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने प्रसाद लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. लाड यांना उमेदवारी मिळणार असल्याचे केवळ दै. पुढारीने वृत्त प्रकाशित केले होते.दरम्यान, काँग्रेसने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. दिलीप माने यांना उमेदवारी दिली असून त्यांनी दुपारी एक वाजता अर्ज दाखल केला.

रविवारी रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. रात्री लाड यांना वर्षावर बोलविण्यात आले होते. आज सकाळी त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आले आहेत. सिद्धिविनायक ट्रष्टचे ते विश्वस्त होते तसेच ते म्हाडाचे अध्यक्ष देखील होते. मुंबईतील सहकारी संस्थांच्या शिखर संस्था असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत. 

संबंधित बातमी: 
अर्ज शिवसेनेनेही घेतल्याने भाजपमध्ये धाकधूक

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी