होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कॉमर्सला अच्छे दिन, सायन्स पिछाडीवर !

कॉमर्सला अच्छे दिन, सायन्स पिछाडीवर !

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

अकरावी ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ झाल्यापासून गेल्या तीन दिवसात महाविद्यालयांचा पसंतीक्रमांक देवून अर्ज भरलेल्या 1 लाख 32 हजार विद्यार्थ्यांंपैकी 82 हजार विद्यार्थ्यांनी कॉमर्सला पसंती दिली आहे. तर 40 हजार 966 विद्यार्थ्यांनी सायन्स शाखेला महत्व दिले आहे. गेल्याकाही वर्षाप्रमाणे यंदाही कॉमर्सचा पगडा कायम आहे.  

दहावीच्या निकालानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेशाला जोरदार सुरुवात झाली आहे. तब्बल 2 लाख 6 हजार 699 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी पहिल्या अर्जानुसार शुक्रवार सायंकाळपर्यंत नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 32 हजार 907 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम देत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे विद्यार्थी पहिल्या गुणवत्ता यादीसाठी सज्ज झाले आहे. या अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कॉमर्स शाखेला प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल आहे. आतापर्यंत 82 हजार 180 विद्यार्थ्यांनी कॉमर्स शाखा निवडली आहे. तर विज्ञान शाखा 40 हजार 966 विद्यार्थ्यांनी आणि कला शाखा 9367 विद्यार्थ्यांनी आणि एमसीव्हीसी शाखा 86 विद्यार्थ्यांनी निवडली आहे.