Sun, May 19, 2019 14:23
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉ परीक्षा पुढे ढकला!

लॉ परीक्षा पुढे ढकला!

Published On: Jan 09 2018 2:03AM | Last Updated: Jan 09 2018 1:27AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या लॉ विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थी तसेच आता   बार कौन्सिल ऑफ इंडियादेखील पुढे आली आहे. कौन्सिलच्या आजी-माजी सदस्यांसह इतर विद्यार्थी संघटनांनीदेखील सोमवारी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेत परीक्षा पुढे ढकलण्यासाठी निवेदन दिले आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाच्या निणर्णयामुळे लॉचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसताना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एलएलएमच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी संघटनांनी याविरोधात आवाज उठवित ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. केवळ 20 दिवसाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अशक्य असल्याने या परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे असल्याचे निवेदन त्यांनी यावेळी कुलगुरूंना दिले. यासंदर्भात कुलगुरूंबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली असून लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पवार यांनी दिली आहे.