Wed, Mar 20, 2019 22:56



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडाच्या कोंकण, नागपूर मंडळाच्या सदनिका सोडत नोंदणीचा आज शुभारंभ 

म्हाडाच्या कोंकण, नागपूर मंडळाच्या सदनिका सोडत नोंदणीचा आज शुभारंभ 

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:50AM



मुंबई : प्रतिनिधी 

म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या 9 हजार 18 आणि नागपूर मंडळाच्या 1 हजार 514 सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात येणार आहे. 

नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित राहणार आहेत.    

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात परवडणार्‍या घरांची सर्वाधिक गरज अधोरेखित झाली असताना म्हाडाची ही नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीकरिता प्राप्त अर्जांची पहिली संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयामध्ये 19 ऑगस्टला सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे.