Tue, Feb 19, 2019 10:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लतादीदींच्या ट्विटरवरून रमजानच्या शुभेच्छा, नेटकर्‍याच्या मात्र शिव्या

लतादीदींकडून रमजानच्या शुभेच्छा, नेटकर्‍याच्या मात्र शिव्या

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:33AMमुंबई :  प्रतिनिधी

लतादीदी सोशल मीडियावर अनेकदा शुभेच्छा देत असतात. वाढदिवस, पुण्यतिथी किंवा अन्य विशेष दिनांच्या वेळी त्या ट्विटरच्या माध्यमातून आवर्जून शुभेच्छा देतात. नुकताच रमजानचा महिना सुरू झाला असल्याने त्यांनी ट्विट करून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर अनेकांनी त्यांचे आभार मानत त्यांना रीट्विटही केले. मात्र, अत्तिक उर रहमान नावाच्या एका नेटकर्‍याने त्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांच्याविषयी अपशब्द लिहिले व त्यांना शिव्या दिल्या. सध्या सोशल मीडियाच्या युगात सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांमधले अंतर कमी होत आहे.

त्याचा दुष्परिणामही होतो आणि अनेकदा सेलिब्रिटी ट्रोल होतात. आता या यादीत लता मंगेशकर यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. रमजानच्या शुभेच्छांच्या बदल्यात एका नेटकर्‍याने त्यांनी शिवी दिली आहे. या ट्विटवर लतादीदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही; पण इतर नेटकर्‍यांनी त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली. लतादीदींना ट्रोल करू पाहणार्‍या या ट्रोलरला नेटकर्‍यांनी शाब्दिक फटके द्यायला सुरुवात केली. धर्मनिरपेक्षपणे दिलेल्या शुभेच्छांच्या बदल्यात असे वागणे चुकीचे असल्याचे अनेक नेटकर्‍यांचे म्हणणे होते.  शुभेच्छांच्या बदल्यात शिवी देणे म्हणजे त्या व्यक्‍तीचा अपमान करणे आहे. कोणत्याही धर्मामध्ये असे सांगितलेले नाही, तरीही लतादीदींना शिवी देण्यात आली आहे. त्याचा सर्वांनीच निषेध करायला हवा, असे मतही नेटकर्‍यांनी व्यक्‍त केले आहे.