Tue, Jul 23, 2019 18:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळाचौकीत जमीन खचून घरात 20 फुटांचा खड्डा

काळाचौकीत जमीन खचून घरात 20 फुटांचा खड्डा

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:53AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईच्या काळाचौकी परिसरातील वेस्टर्न इंडिया मिल चाळीमधील एका घराची जमीन अचानक रविवारी खचली. जमीन खचल्याने 20 फूटचा खोल खड्डा याठिकाणी पडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक घर पूर्णतः खचले असून मोठा खड्डा तयार झाला आहे. या परिसरातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  

मुंबई महानगरपालिकेकडून या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी मोठ्या मशीनच्या साहाय्याने जमिनीत खोदकाम सुरु आहे. खोदकामामुळे जमिनीला हादरे बसून जमीन खचत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना ऐन पावसात भितीने बाहेर बसण्याची नामुष्की ओढावली आहे. भर पावसामध्ये आता आपण कुठे जायायचे ? असा प्रश्‍न या कुटूंबाला पडला आहे.

28 जूनला ही याच परिसरात घरातील जमीन खचल्याचा प्रकार घडला होता. जमीन खचल्याने पडलेल्या खड्ड्यात चारजण अडकले होते. स्थानिकांनी आणि पोलिसांनी शिडी आणि दोरीच्या साहाय्याने या चौघांना खड्ड्याबाहेर काढले होते. सुदैवाने दोन्ही घटनेती कोणतीही जीवितहानी झालेली नाही, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आणि अग्निशमन दलाने शेजारचं एक घर आणि हॉटेल तात्काळ रिकामे केले. मात्र नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वडाळ्यात गेल्या आठवड्यामध्येच मुसळधार पावसामुळे लॉयेट्स इस्टेट इमारतीची संरक्षक भिंत खचल्याची घटना घडली होती. या घटनेत सहा वाहनांचे नुकसान झाले होते.