Mon, Nov 19, 2018 19:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लालूप्रसादांची प्रकृती बिघडली, तपासणीसाठी मुंबईत दाखल 

लालूप्रसादांची प्रकृती बिघडली;मुंबईत दाखल 

Published On: May 23 2018 7:56AM | Last Updated: May 23 2018 7:56AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

चक्कर येणे, रक्तदाब व साखरेत चढ-उतार अशा प्रकृतीसंदर्भातील तक्रारीनंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना आज (२३ मे) उपचारासाठी मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबईतील  एशियन हार्ट इन्स्टीन्स्ट्यूटमध्ये त्‍यांच्यावर उपचार सुरु असून, त्‍यांच्यासोब त्‍यांचा मुलगा तेजस्वी आणि मुलगी मिसाभारती हे आहेत.

दरम्‍यान, शनिवारी त्‍यांना उपचारासाठी पाटण्यातील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (आयजीआयएमएस) येथे दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता व्हील चेअरवर लालूप्रसाद आयजीआयएमएस येथे पोहोचले. आयजीआयएमएसचे वैद्यकीय अधीक्षक मनीष मंडल यांनी लालूंवर उपचार केले. या वेळी कॉर्डिऔलॉजी, नॅफ्रॉलॉजी, यूरॉलॉजी, आर्थोच्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.

Tags : Lalu Prasad Yadav, Mumbai, treatment