Mon, Jan 21, 2019 00:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लिंगबदलानंतर ललित साळवे घरी

लिंगबदलानंतर ललित साळवे घरी

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:38AMमुंबई :

 बीड जिल्ह्यातील पोलिस शिपाई ललिता साळवे यांची लिंगबदल शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, मंगळवारी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता ललिता साळवे यांची ओळख ललित अशी असणार आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी इच्छुक असणारे अनेक लोक रुग्णालयात फोन करून विचारणा करत असून, अनेकांनी प्रत्यक्ष रुग्णालयात भेट देऊन शस्त्रक्रियेसाठी विचारपूस करायला सुरुवात केली आहे.  

लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक पुढे येऊ लागले आहेत की, शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात एका विशेष वॉर्डची सुरुवात करण्याचा रुग्णालयाचा विचार असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांकडून समजली. याविषयीचा औपचारिक प्रस्ताव तयार करून पालिका रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता यांच्याकडे पाठविला जाईल.  प्रस्ताव पारित झाला, तर सेंट जॉर्ज रुग्णालय हे अशाप्रकारची ओपीडी सुरू करणारे मुंबईतीलच नव्हे, तर देशातील पहिले रुग्णालय ठरू शकते.