Thu, Apr 25, 2019 15:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रासह देशविदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा 85 वा पाद्यपूजन सोहळा मंगळवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांनी गणपती बाप्पा मोरया असा एकच जयघोष यावेळी केला. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात. त्यामुळे पाद्यपूजन झाल्यानंतर आता भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी आस लावून बसले आहेत.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने लालबागच्या राजाचे पाद्यपूजन सोहळा मंगळवारी पार पडला. हे पाद्यपूजन अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते हनुमान मंदिर लालबाग येथे करण्यात आले. यावेळी मंदिरासह मंडप फुलांनी सजविण्यात आला होता. त्यानंतर गणपतीचा पाद्यपूजन करण्यात आले. गणपतीच्या आरतीने या सोहळ्याचा समारोप झाला.

लालबागच्या राजाच्या पाद्यपूजासाठी आलेल्या काही भक्तांकडून लालबागच्या राजाच्या मंडपासभोवती रांगोळी काढण्यात आली होती. अनेक सेल्फीप्रेमींना या रांगोळीसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.

यंदा दरवर्षी पेक्षा वेगळा देखावा पहायला मिळणार आहे. देखावा साकारणार्‍या कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी यावर्षी प्लास्टिक व मखरमुक्त पर्यावरण पूरक देखावा साकारणार असल्याची माहिती दिली. तसेच मूर्ती परिसर वाढल्याने बाहुबलीतील धबधबा साकारता येईल का याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.