होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या राजाचे पाद्यपूजन उत्साहात!

मुंबईच्या राजाचे पाद्यपूजन उत्साहात!

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्लीच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा शुक्रवारी गणपती बाप्पा मोरया जयघोषासहित ढोल-ताशाच्या गजरात थाटामाटात पार पडला.

मुंबईच्या राजाच्या मूर्तीची उंची तसेच देखाव्यात वेगवेगळ्या मंदिरांच्या मनमोहक प्रतिकृती उभारून हे मंडळ नेहमीच आपले वेगळेपण दाखवून देते. थर्माकोलचा वापर देखाव्याच्या सजावटीसाठी कुठेही केला जात नाही. राजाच्या देखाव्यासाठी यंदा मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील सूर्यमंदिराचा देखावा अमन विधाते साकारणार आहेत. मंडपात केळीच्या बुंध्यापासून तयार केलेली आकर्षक सजावट लोकांचे मन मोहून टाकीत होती. ही सजावट वारकरी मंडळाकडून करण्यात आली होती.

अशी माहिती मंडळाचे संयुक्त चिटणीस मिलिंद सुर्वे यांनी दिली.पर्यावरणपूरक सजावट मंडळाकडून केली जाते. तसेच डीजेऐवजी ढोल ताशाच्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले जाते. यावर्षी 22 फुटी गणेशमूर्ती साकारण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी दिली.