Thu, Mar 21, 2019 00:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'लगे रहो मुन्‍ना भाई' फेम किशोर प्रधान यांचे निधन 

'लगे रहो मुन्‍ना भाई' फेम किशोर प्रधान यांचे निधन 

Published On: Jan 12 2019 12:31PM | Last Updated: Jan 12 2019 12:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्‍ये विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते किशोर प्रधान यांचे वयाच्‍या ८६ व्‍या वर्षी निधन झाले. आपल्‍या अभिनयाने त्‍यांनी मराठी आणि इंग्रजी रंगमंचावर आपल्‍या अभिनयाची छाप सोडली होती. महेश मांजरेकर  दिग्‍दर्शित 'लालबाग परेल' आणि 'शिवाजी राजे भोसले बोलतोय'मध्‍ये किशोर यांनी दमदार भूमिका केल्‍या. त्‍याचबरोबर, 'लगे रहो मुन्ना भाई' आणि 'जब वुई मेट'मध्‍ये त्‍यांनी साकारलेल्‍या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

किशोर यांचा जन्म नागपूरमध्‍ये एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्‍यांना अभिनयाचे धडे लहानपणापासूनच मिळाले होते. त्‍यांची आई मालतीबाई प्रधान यादेखील ४० वर्षे मराठी रंगमंचाशी संबंधित कार्यरत होत्‍या. किशोर यांनी नागपूरच्‍या मारिस महाविद्यालयातून १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण घेण्‍यासाठी ते मुंबईत आले. नंतर  'टाटा इन्‍स्‍टिट्‍यूट ऑफ सोशल सायन्‍स'मध्‍ये रिसर्च स्कॉलर म्‍हणून त्‍यांनी दोन वर्षे काम केले. 

Image result for kishore pradhan

त्‍याचवेळी त्‍यांनी अनेक बड्‍या स्टेज शोमध्‍ये काम केले. त्‍यांनी १००हून अधिक मराठी आणि १८ इंग्रजी नाटकांमध्‍ये काम केले. त्‍यांचे पहिले इंग्रजी नाटक ‘बॉटम अप्स’ होते. 

 हिंदी चित्रपट

‘लगे रहो मुन्नाभाई’मध्‍ये ‘खटय़ाळ म्हातार्‍या’ची भूमिका प्रधान यांनी साकारली होती. या चित्रपटात त्‍यांची छोटी भूमिका असली तरी ते आपल्‍या अभिनयाची छाप सोडली. ‘जब वुई मेट’मधील त्यांनी ‘स्टेशन मास्तर’ची भूमिका साकारली होती.