Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव-भीमा प्रकरणी जात,धर्म बघणार नाही : CM

कोरेगाव-भीमा प्रकरणी जात,धर्म बघणार नाही : CM

Published On: Mar 13 2018 4:10PM | Last Updated: Mar 13 2018 6:22PMमुंबई : प्रतिनिधी 

कोरेगाव-भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी असून त्याचे कुणीच समर्थन करणार नाही. या घटनेस जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या घटनेत सर्वच समाजातील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची सर्व भरपाई राज्य सरकार देईल. बंदच्या काळातील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. जाणीवपूर्वक ज्यांनी लूटमार केली त्या सराईत गुन्हेगारांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. या घटनेशी संबंधित प्रकरणातील अधिक चौकशीसाठी मिलिंद एकबोटे यांची कस्टोडीयन इंटोग्रेशन करण्याची परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकार ॲटर्नी जनरल मार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरे-भीमा प्रकरणात जात, धर्म पाहून कुणावर कारवाई केली जाणार किंवा कुणाला पाठीशी घालणार नाही. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एकबोटे यांना वाचविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना अटक करण्यासाठी पुणे, कोल्हापूर येथे काँबिग ऑपरेशन करण्यात आले. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश मध्ये शोध घेतला तसेच त्यांचे जवळचे नातेवाईक व 100 फोन नंबरची तपासणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.