Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोपर्डी ; वेगवान पद्धतीने न्यायदान झाले: विजया रहाटकर

कोपर्डी ; वेगवान पद्धतीने न्यायदान झाले: विजया रहाटकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोपर्डी प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटले आहे.

निकाल कळल्यानंतर श्रीमती रहाटकर म्हणाल्या कि, या निर्णयाने त्या भगिनीला न्याय मिळाला आहे. तिला परत आणता येणार नाही मात्र या नराधमांना कठोर शिक्षा मिळाली आहे .गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशी ची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली आहे. या निर्णयाने कायद्याचे भय निर्माण झाल्याने यापुढे कोणीही असा अत्याचार करण्यास धजावणार नाही.

कोपर्डीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून राज्य सरकारने पीडित मुलीला, तिच्या कुटुंबियांना जलद न्याय मिळवून दिला आहे. ही शिक्षा उच्च न्यायालयामध्येही कायम राहील यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल अशी खात्री ही त्यांनी व्यक्त केली.