Tue, Jan 22, 2019 20:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकण मराठी माध्यमिक संघाचा डावखरेंना पाठिंबा

कोकण मराठी माध्यमिक संघाचा डावखरेंना पाठिंबा

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 1:07AMठाणे : प्रतिनिधी

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना कोकण व मुंबई मराठी माध्यमिक शिक्षक संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी खास पत्रक काढून ही  माहिती दिली.  ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळानेही साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बी. एन. पाटील यांनी जाहीर केले.

कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी शिकविणार्‍या माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे कोकण व मुंबई मराठी माध्यमिक शिक्षक संघ प्रतिनिधीत्व करीत आहे. संघाच्या सर्व  सदस्यांचा  डावखरेंना पाठिंबा राहील, असे बोरनारे यांनी सांगितले.  कल्याण येथे झालेल्या अधिवेशनाला डावखरे यांनी संपूर्ण सहकार्य केले होते. त्यामुळे हा पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गणित अध्यापक मंडळाची साथ

ठाणे जिल्ह्यात गणिताच्या प्रसाराला दिवंगत नेते वसंत डावखरे व निरंजन डावखरेंनी कायम साथ दिली.  प्रत्येक शाळेत गणित प्रयोगशाळा उभारण्याचा संकल्प निरंजन डावखरे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत त्यांना गणित अध्यापक मंडळाची साथ राहील, असे मंडळाने पत्रकान्व्यये जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक शिक्षण कर्मचारी महासंघानेही निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिल्याचे महासंघाचे अध्यक्ष एन. ए. जमादार, कार्याध्यक्ष व्ही. एस. आंग्रे आणि सचिव कैलास गायकवाड यांनी पत्रकात नमूद केले आहे.