Thu, Jul 18, 2019 00:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाळासाहेबांप्रमाणे उद्धव यांनी शेतकऱ्यांसोबतचे नाते जपावे : अजित नवले

बाळासाहेबांप्रमाणे उद्धव यांनी शेतकऱ्यांसोबतचे नाते जपावे : अजित नवले

Published On: Mar 11 2018 12:56PM | Last Updated: Mar 11 2018 12:56PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना आणि विविध पक्षांनीच नव्हे तर ह्रदय जिंवत असणाऱ्या प्रत्येकाने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन किसान मोर्चात सहभागी झालेले काँम्रेड नेते अजित नवले यांनी केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक प्रसंगात आरपार बाण्याची भुमिका घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्यासोबत हेच नाते कायम ठेवतील, अशी आशा नवले यांनी व्यक्त केली. आमची विचारधारा वेगळी असली तरी शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  

वाचा लाँग मार्च का? काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

ठाण्यात पोहचलेल्या किसान मोर्चाला पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ खडसे यांनी भेट दिली. यावेळी  नवले म्हणाले की, ज्याप्रमाणे पाहुणचार केला त्याप्रमाणेच शिवसेनने उद्याही आमच्यासोबत उभे रहावे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर १७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.      

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्या, शेतकरी कसत असणाऱ्या जमीनीचा सातबारा त्यांच्या नावे व्हावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा, या मागण्यांसाठी हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ७ दिवस आम्ही चालत आहोत. आम्ही रिकाम्या हाती परत जाणार नाही. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ती मानवतेची हार असेल, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. शिवसेना आणि विविध पक्षांनीच नव्हे तर ह्रदय जिवंत असणाऱ्या सर्वांनी शेतकऱ्यांना साथ द्यावी, असे ते म्हणाले. 
 

वाचा : शेतकऱ्यांचा लाल हुंकार मुंबईत; वाहतूक व्यवस्थेत बदल

वाचा :  किसान मोर्चा Live : अर्धे सरकार आमच्यासोबत - जयंत पाटील