Mon, Apr 22, 2019 04:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बळीराजा जिंकला; सरकारकडून सर्व मागण्या मान्य, दिली लेखी हमी!

बळीराजा जिंकला; सरकारकडून सर्व मागण्या मान्य, दिली लेखी हमी!

Published On: Mar 12 2018 4:18PM | Last Updated: Mar 12 2018 6:13PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्या सहा दिवसांपासून जवळ जवळ 180 किलो मीटर चालत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आझाद मैदानात केली. शेतकऱ्यांनी गेलेल्या मागणी प्रमाणे या सर्व मागण्या मान्य केल्याची लेखी हमी सरकारकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सर्व मागण्या उद्या (मंगळवारी) विधानसभेत मांडल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

त्याआधी  6 मार्चपासून नाशिकहून चालत आलेल्या हजारो शेतकरी पहाटेच आझाद मैदानात पोहोचले होते. त्यानंतर दुपारी 3च्या सुमारास शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची बैठक झाली. ही बैठक 3 तास सुरु होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे महाजन यांनी सांगितले. बैठक झाल्यानंतर शिष्टमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, विष्णू सावरा हे आझाद मैदानात पोहोचले. येथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांसमोर चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत कोणते निर्णय झाले याची माहिती दिली.

बैठकीत कोणत्या मागण्या मान्य झाल्या

> जीर्ण झालेल्या शिधापत्रिका तीन महिन्यात बदलून देणार  
> वन हक्क कायद्यातील अपात्र दावे निकाली काढणार 
> आदिवासी भागातील रेशन कार्डची तीन महिन्यात दुरूस्ती
> वन जमीनीबाबत येत्या ६ महिन्यात निर्णय घेणार
> १२ ते १३ मागण्या होत्या, सरकारने सकारात्मक घेतल्या
> 30 जून 2017 पर्यंतची कर्जमाफी करणार 
> कर्जमाफीसाठी 2001पासून लाभ मिळणार
> पती आणि पत्नी दोघांच्या नावावर दीड लाख कर्ज असेल तर ते सर्व माफ होणार
> एकाच कुटुंबात 2 ते 3 कर्जदार असतील तर ते माफ करण्याबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घेणार
> पुढील दोन महिन्यात सरकार धोरणात्मक निर्णय घेणार 
> बुलेट ट्रेन, धरणे आणि रस्ते बांधण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या सहमतीनेच घेणार 
> नदी जोड प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन 
> कर्जमाफीच्या अटी शिथिल करणार 
> संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार
> बोंडअळी आणि गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई वाटप होणार
> कृषिमूल्य आयोगावर किसान सभेचे 2 सदस्य असणार  
> दुधाच्या दर निश्चितीसाठी स्वतंत्र बैठक घेणार