Sat, Jan 19, 2019 11:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कीर्तीच्या मृतदेहासाठी शोध मोहीम

कीर्तीच्या मृतदेहासाठी शोध मोहीम

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरी येथील बिब्लंट कंपनीतील फायनान्स मॅनेजर किर्ती राजेंद्र व्यास या 28 वर्षांच्या तरुणीची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता तिचा मृतदेह शोधून काढण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. त्यासाठी गुन्हे शाखेकडून मनपा कर्मचार्‍यासह स्थानिक मच्छिमारांची मदत घेण्यात येत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत या दोघांनी किर्तीचा मृतदेह वडाळा येथील आयनॉक्स सिनेमागृहाजवळील माहुल गावजवळील नाल्यात फेकून पुरावा नष्ट केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी याच परिसरात शोधमोहीम सुरु केली होती.

किर्ती ही ग्रँटरोड परिसरात तिच्या पालकांसोबत राहत होती. अंधेरीतील बिब्लंट या खाजगी कंपनीत ती फायनान्स मॅनेजर म्हणून काम करीत होती. याच कंपनीत सिद्धेश शांताराम ताम्हणकर आणि खुशी अजय सजवानी हे दोघेही कामाला होते. 16 मार्चला कंपनीपर्यंत लिफ्ट देण्याचा बहाणा करुन या दोघांनी खुशीच्या कारमधून किर्तीचे अपहरण केले . खुशी ही विवाहीत असून ती तिच्या पती आणि पंधरा वर्षांच्या मुलासोबत राहते. तिला मॅनेजर म्हणून ऐंशी हजार तर सिद्धेशला वीस हजार रुपये वेतन मिळत होते.

कंपनीत काम करताना दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अशा सर्वच स्तरावर खुशी ही सिद्धेशच्या गरजा पूर्ण करीत होती. त्यामुळे त्याला खुशी सवय लागली होती.  या जीएसटीमुळे सिद्धेशच्या हातून अनेका चुका होत होत्या. त्यामुळे किर्तीला वरिष्ठांनी सिद्धेशला समज देण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठांकडून आदेश मिळताच तिने सिद्धेशला कामात सुधारणा करा नाहीतर सक्त कारवाई करण्याची नोटीस बजावली होती. या नोटीसची मुदत 16 मार्चला संपत होती. त्याला किर्ती आपल्याला कामावरुन काढून टाकेल अशी भीती होती, त्यामुळे खुशीच्या मदतीने किर्तीच्या  हत्येची योजना बनविली होती. 

Tags : Mumbai, mumbai news, Kirti Dead body, Search campaign,