Fri, Feb 22, 2019 21:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्हापूरच्या राजाचे चिंचपोकळीतून प्रस्थान

कोल्हापूरच्या राजाचे चिंचपोकळीतून प्रस्थान

Published On: Aug 06 2018 1:41AM | Last Updated: Aug 06 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

लालबागच्या राजाची प्रतिकृती असणार्‍या कोल्हापूरच्या राजाचे गणपतीबाप्पा मोरयाच्या जयघोषात  चिंचपोकळी येथील कांबळी आर्टस कार्यशाळेतून रविवारी कोल्हापूरकडे प्रस्थान झाले. कोल्हापूर रंकाळा स्टँड येथील कोल्हापूरचा राजा गोल सर्कल मित्र मंडळातर्फे या गणपतीची स्थापना करण्यात येते. हा राजा तब्बल 27 तासाच्या प्रवासानंतर कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहे. कोल्हापूरच्या राजाचे यंदाचे पाचवे वर्ष असून 9 फुटी मनमोहक मूर्ती संतोष कांबळी यांनी साकारली आहे. गेली 5 वर्ष कांबळी ही मूर्ती साकारत आहेत.

लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीचे दर्शन कोल्हापूरकरांना व्हावे, यासाठी लालबाच्या राजाची मूर्ती साकारणार्‍या कांबळी आर्टस कार्यशाळेत गणेशमूर्ती बनविण्याना निर्णय घेतला. गिरगावच्या नाना वेदक यांनी बनविले दागिने राजाला घालण्यात आले आहेत. ट्रकमध्ये वाळू पसरवून राजाच्या मूर्तीने मुंबईतून कोल्हापूरकडे प्रस्थान केले आहे. कोल्हापूरच्या ढोल- ताशाच्या गजरात राजाचा आगमन सोहळा पार पडणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले.