Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बालिकेचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या

बालिकेचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नालासोपारा : वार्ताहर

नालासोपारा पूर्वेत विजय नगर येथे राहणार्‍या एका बालिकेचे एका महिलेने शनिवारी अपहरण करून तिची गुजरातमधील नवसारी रेल्वे स्टेशनच्या महिला शौचालयात धारधार शस्त्राने गळा कापून रविवारी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी संध्याकाळी (काल) तुळींज पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. यावेळी मुलीच्या नातेवाईकांसह जमावाने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करून तुळींज पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली तसेच काही वेळ रस्तारोको केला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.

नालासोपारा पूर्वेत विजय नगर येथे राहणारी अंजली संतोष सरोज (6) ही मुलगी घराबाहेर रस्त्यावर खेळत असताना तिला एका महिलेने कशाचे तरी अमिष दाखवून तिचे अपहरण केले. अपहरण करून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज बाजूलाच असणार्‍या लोकमान्य शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. अंजली शनिवारी रात्री 8 च्या सुमारास गायब झाली. आम्ही त्वरित तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ दखल घेतली असती तर मुलगी जिवंत सापडली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया अंजलीचे आजोबा हरिश्‍चंद्र सरोज यांनी दिली.

शनिवारी रात्री 11. वाजता अंजली बेपत्ता झाल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात आली. त्यानंतर रात्री दोन वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल करून रविवारी सकाळी चार पथके रवाना करण्यात आली होती. 

Tags : mumbai news, mumbai, kidnapping baby girl, Killing, Gujarat,


  •