Sun, Feb 24, 2019 00:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किकी चॅलेंजनंतर आता मेरी पॉपिन्सचे जीवघेणे खूळ

किकी चॅलेंजनंतर आता मेरी पॉपिन्सचे जीवघेणे खूळ

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:58AMमुंबई : प्रतिनिधी

मागील वर्षी ब्ल्यू व्हेल या अत्यंत घातक अशा मोबाईल गेमच्या आव्हानामुळे सगळीकडे हाहाकार माजला होता. ते कमी की काय म्हणून यावर्षी मोमो आणि किकी या चॅलेंजने धुमाकूळ घातला. आता यात अजून एका चॅलेंज गेमची भर पडली. मेरी पॉपिन्स नावाचे हे जीवघेणे चॅलेंज नेटिझन्समध्ये प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. हे चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.  
सोशल माध्यमावर कधी कोणती गोष्ट आव्हान म्हणून व्हायरल होईल आणि त्याचे भूत नेटिझन्सच्या अंगात शिरेल याचा काही नेम नसतो. पण त्यांच्या या खेळापायी पोलीस यंत्रणेसोबतच इतर यंत्रणांवर प्रचंड ताण पडतो. 

शिवाय कुटुंबीयदेखील तणावाखाली जीवन जगतात. ब्ल्यू व्हेल, मोमो आणि किकी चॅलेंज या जीवघेण्या गेममधून अजून सोशल माध्यमांमध्ये अडकून पडलेल्या तरुणांची सुटका झालीच नसताना आता त्यात  भर म्हणून मेरी पॉपिन्सने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.