Sat, Nov 17, 2018 21:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड : दोन कॉलेज युवकांचे अपहरण?

महाड : दोन कॉलेज युवकांचे अपहरण?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महाड : प्रतिनिधी

महाड शहराजवळील कॉलेज येथे जातो असं सांगून बाइकवरून गेलेल्या दोन कॉलेज युवकांचे अपहरण केल्याची तक्रार महाड शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हीच चर्चा सुरू आहे. हि घटना काल शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. तर यासंबंधीची तक्रार आज रविवारी महाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे

यासंदर्भात फिर्यादी नीलम निलेश पेडामकर (वय 43 राहणार केशवसृष्टी डोंगरी पुलाजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा विशाल पेडामकर (वय 17) व त्याचा मित्र समीर पिसाळ (रा. सावरट ता. महाड) हे दोघे काल शनिवारी सकाळच्या सुमारास महाड शहराजवळील हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट च्या कॉलेजला जातो असे सांगून गेले होते. मात्र हे दोघे अद्याप घरी परतले नसल्याने विशाल याच्या आईने निलम पेडामकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस लावरे हे करीत आहेत. या तक्रारीनुसार पोलिसांनी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट च्या कार्यालयात चौकशी केली असता दोन्ही विद्यार्थी या कॉलेज मध्ये आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.