Wed, May 22, 2019 14:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपहरण झालेल्या वैद्य बंधूंची मलेशियातून सुटका

अपहरण झालेल्या वैद्य बंधूंची मलेशियातून सुटका

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMडोंबिवली : प्रतिनिधी

उद्योग-व्यावसायासाठी मलेशियात असलेल्या डोंबिवलीतील कौस्तुभ प्रकाश वैद्य (31) व रोहन (36) या दोघा सख्ख्या भावांचे तेथील खंडणीखोरांनी अपहरण केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. दरम्यान, या दोघा भावंडांची 6 तारखेला अपहरणकर्त्यांनी सुटका केली. त्यानंतर ते दुपारी मुंबईत दाखल झाले व शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्यांना सुखरूप डोंबिवलीत पोहोचवले. यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वैद्य बंधूंचे काका राजू वैद्य यांनी आपल्या पुतण्याचे अपहरण झाले व 1 कोटी खंडणी मागीतल्याची तक्रार डोंबिवली पोलीस ठाणे आणि ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासकार्य सुरु केले होते. अखेर 6 ऑगस्ट रोजी दोन्ही बंधूंची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली. मात्र त्यांच्यापैकी अजूनही कुणी बोलण्यास तयार नाहीत. या बंधूंची सुटका कशी झाली,याची माहिती अद्यापी उघड झालेली नाही.