Tue, Jun 18, 2019 20:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

शिवडीत बाळाच्या गळ्यावर सुरी ठेवून दरोडा!
 

शिवडीत बाळाच्या गळ्यावर सुरी ठेवून दरोडा!
 

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 1:52AMधारावी : वार्ताहर

सराईत दरोडेखोरांनी पलंगावर झोपलेल्या बाळाच्या गळ्यावर सूरी ठेवून भरदिवसा 5 लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची धक्कादायक घटना शिवडीच्या टी.जे. रोडवरील स्वान मिल म्हाडा संकुलाच्या पंधराव्या मजल्यावर 26 मार्चला घडली होती. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच परिमंडळ 4 पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात काळाचौकी पोलिसांना यश आले आहे. 

एका अल्पवीन दरोडेखोरासह अवधेश राजकुमार विश्वकर्मा (26), अजय ऍग्नेल ठवाले (24) यांना पोलिसांनी अटक केली. अजमेरा आलमगीर खान यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी इमारतीच्या लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एका दरोडेखोराचा चेहरा दिसला. काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, माटुंगा पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक विजयकुमार अंबरगे आपल्या पथकासह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरु केला असता या त्रिकुटातील एक जण दिव्याचा असल्याचे समजले. 

स्थानिक पोलिसांच्या मदतीने दरोडेखोराच्या दिव्यातील घरावर छापा मारला असता त्याच्या घराला टाळा होता. पोलिसांनी साध्या वेशात दिवा स्थानकात सापळा रचून शेवटच्या गाडीने दरोडेखोर पत्नीसह उतरल्याचे दिसताच अंबरगे यांनी अवधेश विश्वकर्मा याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता अँटॉप हीलच्या बरकतअली परिसरात छापा मारून इतर दोघांना अटक केली.